मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारला जत तालुक्याच्या भेटीवर

संख(जमादार राजेभक्षर),दि.11ः– सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे रविवार १२ मे रोजी सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी येत आहेत.ते यावेळी जत व आटपाडी खानापूरच्या दुष्काळग्रस्त भागात भेटी देणार असून नागरिकांशी सवांद साधणार असल्याची माहिती आरपीआयचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ,तासगांव व मिरज पूर्व भाग दुष्काळात होरपळून निघाला आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली आहे, अशा दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले येणार आहेत.तरी जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले.

Share