मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम, दि. १8 : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच गोवंश हत्या व जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या.यावेळी जिल्हा पशुसंवर्ध उपायुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. इर्शाद खान, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एन. डी. खाजोने, प्रभारी सहाय्यक वन संरक्षक एस. आर. नांदुरकर, पोलीस निरीक्षक बी. जी. कऱ्हाळे यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार राज्यात गोवंशीय प्राण्यांची कत्तल करणे तसेच कत्तलीकरिता वाहतूक करण्यास मनाई आहे. गोवंशीय प्राण्यांची कत्तलीकरिता खरेदी विक्री अथवा वाहतूक होत असल्यास त्यावर परिवहन विभाग व पोलीस विभागाने कारवाई करावी. तसेच गोवंशीय प्राण्यांची कत्तल होणार नाही, यासाठी सुद्धा आवश्यक कार्यवाही करावी. प्राण्यांची वाहतूक करतांना त्यांना ईजा होणार नाही, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्राण्यांची वाहनांमधून वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, असे प्रमाणपत्र नसल्यास त्या वाहनावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. तसेच यापुढे होणाऱ्या सभेमध्ये या अनुषंगाने जिल्ह्यात किती वाहनांवर कारवाई करण्यात आली, याचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले.

या बैठकीत उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांना केंद्राचा प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र शासनाचा प्राणी संरक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियममधील नियम व अटींचे सविस्तर माहिती देण्यात आली.

Share