वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका

0
67

गोंदिया,दि.24ः– गेल्या अनेक वर्षापासून राज्यात बहुजन समाज पक्ष प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करते मात्र त्यांना पाहिजे तसे यशही आले नाही आणि मतदारांचा त्यांच्यावर विश्वासही बसला नाही.त्यातच राज्यात रिपल्बीकन पक्षाचे झालेल्या तुकड्यामुळे बहुजन समाज हा विविध गटातटात विभागला गेल्याने त्याचा लाभ आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीनेच घेत सत्ता उपभोगली.मात्र या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डाॅ.प्रकाश आंबेडकर,एड.ओवेसीसह काही समविचारवंतानी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी तयार केली.या आघाडीने या निवडणुकीत औरगांबादची शिवसेनेची जागा हिसकावत विजय मिळविला.तर राज्यातील 48 मतदारसंघातून त्यांनी सुमारे 38 लाख मते मिळविली.त्यापैकी 8 जागा या एवढ्या महत्वाच्या होत्या की वंचितमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला.नांदेडमध्ये अशोक चव्हाण,हातंकगणकलेमध्ये राजू शेट्टी,सोलापूरमध्ये सुशिलकुमार शिंदे,माणिकराव ठाकरे,डाॅ.नामदेव उसेंडी यांचा पराभवाचा आकडा बघितल्यास पराभवाला वंचितच कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.तसेच बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते भाजप सेनेच्या विजयात लाभदायक ठरली.

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या आठ उमेदवारांना फटका बसला आहे. निवडणुकीपुर्वी वंचित आघाडीने 12 जागांची केलेली मागणी आणि 8 जागी बसलेला फटका विचारात घेतल्यास आघाडीने कुठेतरी यांच्याशी जुळवून घेतले असते तर आज थोड आघाडीचे चित्र वेगळे राहिले असते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय मिळवू शकले नाहीत, तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी केवळ नऊ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहा आकडी मते मिळवू शकले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असरुदुनी औवेसी यांनी केलेला प्रयोग महाराष्ट्रात बसपच्या तोडीचा निघालेला आहे.बहुजन समाज पक्षाच्या उमेदावरांच्या तुलनेत वंचित आघाडीचे उमेदवार सरस ठरल्यामुळेच महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात ते 38 लाख मत घेण्यापर्यत पोचले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभूत झाले आहेत. ते अकोल्यात दुसऱ्या, तर सोलापुरात तिसºया क्रमांकावर राहिले.दोन्ही ठिकाणी त्यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे.