10 वीचा निकाल जाहीर; सरासरी 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

0
25

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.08 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९  दरम्यान परीक्षा पार पडली.यावषीर्ही राज्यात मुलींनी बाजी मारली.यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

यावर्षी 12 लाख विद्यार्थी पास झाले असून एकूणच उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींची आकडेवारी 77.10 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 12 टक्क्यांनी कमी लागला आहे. नेहमी प्रमाणेच यावेळी सुद्धा मुलींनी बाजी मारली. तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के लागला आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आला आहे. पुणे 82.48%, नागपूर 67.27%, औरंगाबाद 75.20%, मुंबई 77.04%, कोल्हापूर 86.58%, अमरावती 71.98%, नाशिक 77.58% आणि लातूर बोर्डाचा निकाल 72.87% इतका लागला आहे. आपणही बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकता.

17 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने 1 मार्च ते 22 मार्च पर्यंत दहावीची परीक्षा घेतली होती. यामध्ये 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गतवर्षी दहावीचे निकाल 8 जूनला घोषित करण्यात आले होते. गेल्यावर्षीच्या निकालाची सध्याच्या निकालाशी तुलना केल्यास 12 टक्क्यांचा फरत दिसून येतो. गतवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 89.41 टक्के होते.

10 जूनपासून मिळवू शकता उत्तरपत्रिकांच्या प्रत
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी 10 जूनपासून मिळवता येऊ शकतील. यासाठी सर्वच फॉर्म ऑनलाइन उपलब्ध राहतील. 10 जून ते 19 पर्यंत फेरपरीक्षेसाठी आणि 10 जून ते 29 पर्यंत उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले जाऊ शकतील.

एसएमएसने सुद्धा जाणून घेता येईल
विद्यार्थ्यांना एका SMS च्या माध्यमातून सुद्धा आपल्या निकालाची माहिती मिळवता येईल. यासाठी बीएसएनएल यूजर्सला आपल्या मोबाईलवर MHSSC (स्पेस) (आसन क्रमांक) लिहून 57766 वर पाठवावे लागेल.