मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

ब्रायन लाराने केली ताडोबा सफारी

चंद्रपूर,दि.14ः- वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने बुधवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. सकाळी आणि संध्याकाळी केलेल्या दोन सफारींमध्ये त्याला ताडोबातील वाघांसह अस्वल तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन झाल्याची माहिती आहे.क्रिकेट विश्वचषक स्पर्धेशी संबंधित कार्यक्रमांकरिता लारा सध्या मुंबई येथे आला आहे. माजी भारतीय कसोटीपटू अनिल कुंबळे याने लाराला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी जाण्याचा सल्ला दिला होता. मंगळवारी सायंकाळी लारा ताडोब्यात पोहोचला. बुधवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सफारी त्याने केल्याची माहिती आहे. या दरम्यान, सफारीकरिता आलेल्या इतर पर्यटकांनी त्याच्यासह छायाचित्रेही काढून घेतली.

Share