मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

आ.थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी तर वड्डेटीवारची गटनेतेपदी निवड

मुंबई,दि.14 : काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नसीम खान यांची विधानसभेचे उपनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी आमदार बसवराज पाटील तर प्रतोदपदासाठी आमदार के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विधानपरिषदेच्या गटनेतेपदी आमदार शरद रणपिसे, उपनेतेपदी रामहरी रुपनवार आणि प्रतोदपदी आमदार भाई जगताप यांच्या निवडीला मान्यता दिली आहे.

Share