इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर

0
33

Ø  अधिक माहितीसाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ

 अमरावती, दि. 15 : शैक्षणिक सत्र जुलै- ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.  त्यानुसार लेखी परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

            माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते मंगळवार दि. 30 जुलै, 2019 या कालावधीमध्ये असणार. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठीच्या परीक्षेचा बुधवार दि. 17 जुलै ते शनिवार दि. 3 ऑगस्ट 2019 पर्यंत असा कालावधी असून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते बुधवार दि. 31 जुलै, 2019 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता 10 वी व 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व  तोंडी परीक्षा दि. 9 जुलै ते दि. 16 जुलै 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

            या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दिनांक 12 जुन, 2019 पासून उपलब्ध करुण देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे राज्यमंडळ, पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका प्रकटनाव्दारे कळविले आहे.