जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प,शहराला पुरेल ८ दिवस एवढेच पाणी

0
6

गोंदिया,दि.15 : शहराला पाणी पुरवठा करणाèया डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ ८ दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात सुध्दा ०.४७ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात वाढ झाली आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दिवसेदिवस घट होत असल्याने जिल्ह्यात पाण्याची भिषण समस्या निर्माण होऊ लागली आहे.
गोंदिया शहराला डांगोर्लीजवळ उभारण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि विहिरींमध्ये मोजकाच पाणीसाठा होता. तर मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाला आहे. शहरावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून कालव्याव्दारे पाणी आणून मात केली. आत्तापर्यंत पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडून ते डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजने पर्यंत पोहचविण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला फारसे तोंड द्यावे लागले नाही. मात्र वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील सिंचन साठ्यात सुध्दा झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे.
यात पुजारीटोला प्रकल्पाचा सुध्दा समावेश आहे. या प्रकल्पात  केवळ ०.४७ टक्के पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे आता या प्रकल्पातून सुध्दा शहराला पाणी मिळण्याची आशा मावळली आहे. डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींनी सुध्दा तळ गाठला असून त्यात केवळ शहराला १० दिवस पाणी पुरवठा होवू शकेल ऐवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात जोराचा पाऊस न झाल्यास शहरात पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरवासीयांना सुध्दा ग्रामीण भागातील गावक?्यांप्रमाणे पाण्यासाठी तीन चार कि.मी.पायपीट करावी लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यावर नेमका काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यम व लघू प्रकल्पाची स्थिती गंभीर
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम,लघू प्रकल्प आणि मामा तलावांची स्थिती सुध्दा गंभीर आहे.बाघ प्रकल्पातंर्गत येत असलेल्या सिरपूर,कालीसरार व पुजारीटोला धरणात १७.३६ टक्के तर इटियाडोह धरणात फक्त १६.६२ टक्के पाणी साठा आहे.जुनेमालगुजारी तलावात फक्त ४.०२ टक्के पाणीसाठा आजच्याघडीला उपलब्ध आहे.जिल्ह्यात कधी नव्हे एवढी भिषण गर्मा यावेळी पडली असून पाण्याची समस्याही मोठ्याप्रमाणात निर्माण होऊ लागली आहे.जलयुक्त शिवारमुळे पिकपेरणीचे क्षेत्र वाढले असे सांगितले जात असले तरी पिणाच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही.
इटियाडोह धरणात आजच्या तारखेला ५२.८३ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारील १६.६२ टक्के एवढी आहे.तर सिरपूर धरणात १९.८३ टक्के दलघमी पाणीसाठा असून १८.३७ टक्के एवढी टक्केवारी आहे.पुजारीटोला धरणात ०.२० दलघमी पाणी असून ०.४७टक्के पाणी साठी आहे.कालीसरार धरणात ९.७८ दलघमी पाणीसाठा असून ३७.५६ टक्के एवढा आहे.धापेवाडा उपसा सिंचन योजनेत ०१.२७ दलघमी पाणीसाठा असून टक्केवारी ०२.८८ आहे.
जुने मालगुजारी तलाव
जिल्ह्यातील  जुने ३८ मालगुजारी तलावापैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथील तलावात २१.६३ टक्के, कवठा येथील तलावात १९.७० टक्के,माहुरकुडा तलावात ३३.९८ टक्के,निमगाव तलावात ५.९० टक्के,मोरगाव तलावात ८.०३ टक्के गोंदिया तालुक्यातील फुलचूर येथील तलावात १.४४ टक्के,काटी येथील तलावात १.९३ टक्के,मुंडीपार तलावात २.७५ टक्के, सडक अर्जुनी तालुक्यातील खैरी तलावात ४.६२ टक्के,खोडशिवनी तलावात.१.७६ टक्के,लेंडेझरी तलावात ७.६९ टक्के,पळसगाव सौ.तलावात २.५८ टक्के,माहुली तलावात १.६१ टक्के,पुतळी तलावात ८.१०टक्के,सौदंड तलावात १३.८१ टक्के तिरोडा तालुक्यातील मेढा तलावात ०.८५ टक्के,पालडोगंरी तलावात २.९५ टक्के या तलावातच काही पाणी शाठा शिल्लक आहे.त्याची सरासरी ४.०२ टक्के आहे.तर स्थानिकस्तर लपा तलावापैकी देवरी तालुक्यातील छतरटोला तलावात १५.२४ टक्के पाणी साठी आहे.