कारंजा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

0
11

वाशिम, दि. १५ : कारंजा लाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम तथा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव तथा आ. मा. व. (दारिद्र्य रेषेखालील), अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वर्गवारीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. याकरिता प्रवेश अर्जांचे वाटप सुरु झाले आहे. ७ वी, १० वी, १२ वी पास झाल्याची गुणपत्रिका दाखवून अर्ज प्राप्त करून घेता येईल.

अर्ज परिपूर्ण भरून टी. सी., गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह अर्ज वसतिगृह कार्यालयात सादर करावा. शालेय विद्यार्थ्यांचे अर्ज ३० जून २०१९ पर्यंत व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज १५ जुलै २०१९ पर्यंत स्वीकारले जातील, असे गृहपाल ए. आर. गोंडाणे यांनी कळविले आहे.