राज्यस्तरीय निवासी युवा प्रशिक्षण शिबीरासाठी नोंदणी सुरू

0
18

गडचिरोली,दि.१५:- राज्यस्तर निवासी युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचेमार्फत दि.२० ते २९ जुन दरम्यान क्रीडा प्रबोधिणी, पोटेगांव रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दि. १८ जुन पर्यंत जिल्हा क्रिडा अधिकारी,गडचिरोली यांचे कार्यालयात कार्यालयीन कामाचे दिवशी व वेळेत नाव नोंदवावे असे आवाहन चंद्रदीप शिंदे, जिल्हा क्रिडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
युवा गट हा समाजाचा अविभाज्य भाग असून विकास प्रक्रियेतील आवश्यक घटक आहे. युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्य स्त्रोत म्हणून देखील मान्यता देण्यात आलेली आहे. युवकांना स्पर्धेच्या युगात शक्तीशाली स्पर्धक म्हणून पूढे आणण्याच्या उद्देशाने राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने तसेच संचालनालय, क्रिडा व युवक सेवा पुणे यांचे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून दिनांक २० ते २९ जुन २०१९ या कालावधीत युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याकरीता १३ ते ३५ वयोगटातील पदवीधर युवक किंवा नेहरु युवा केंद्र अंतर्गत कार्यरत युवा कर्मी , राष्ट्रीय सेवा योजनेचे २ कॅम्प पुर्ण केलेले विद्यार्थी युवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी युवक, एम.एस.एब्ल्यू , एम.ए. सायकॉलॉजी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी युवक , स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा व महिला मंडळे इ. कडून सामाजिक कार्यात रस घेणारे व आवड असणारे युवक पात्र आहेत. तथापी २२ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एम.एस. एब्ल्यू , पदवीधर युवकांना प्राधान्य देण्यात येईल.