राज्य मंत्रिमंडळातून सावरा,बडोले,कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम,पोटे यांना डच्चू ?

0
18

मुंबई,दि.16(विशेष प्रतिनिधी)ः-गेल्या अनेक वर्षापासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या.त्या चर्चाना आज पुर्णविराम लागणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा  विस्तार आज होणार असून, मंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून  राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून, डॉ. संजय कुटे, अनिल बोंडे, परिणय फुके, अशोक उईके, सुरेश खाडे, बाळा भेगडे, अतुल सावे यांच्याही गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत या दोघांना विस्तारात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या विस्तारात प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम,प्रविण पोटे,विष्णु सावरा यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात आठवलेंच्या रिपाइंलाही एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंचे खास मित्र आणि जुने विश्वासू सहकारी अविनाश महातेकर उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, असे आठवलेंनीच म्हटले आहे.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातून राजकुमार बडोलेप्रती सुरवातीपासूनच नाराजी होती.राज्यातील अनेक आमदारानीही मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली होती,त्यामुळे त्यांना डच्चू देत भंडारा-गोंदियाच्या राजकारणात मुख्यमंत्र्याचे खास विश्वासू असलेले डाॅ.परिणय फुके यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.फुके यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिल्याबदद्ल तसेच पक्षसंघटना आपल्या ताब्यात ठेवत दोन्ही जिल्ह्यातील स्वयघोषीत नेत्यांना दाबल्याबद्दल पुरस्कार स्वरुप हे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.फुके यांच्यापेक्षा अधिक राजकीय अनुभव असलेले आमदार भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असतांना फुकेंचीच निवड गडकरी फडणवीस यांच्यातला दुवा असल्याचे बोलले जात आहे.फुकेंचे नाव येताच भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील भाजपामध्ये नवचैतन्य आले असून नव्या राजकीय अध्यायाला सुरवात होणार आहे.तर एका विशिष्ट समुहाच्या राजकीय वर्चस्वाला संपुष्ठात आणण्यात मिळालेले यश असल्याचेही बोलले जात आहे.