लोकमंगलच्या कृषिदुतांचे भंडारकवठे येथे स्वागत

0
30

सोलापूर/अमीर मुलाणी,दि.17ः- वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत विकास पवार, योगेश सांगुळे,अझर सय्यद, सुनील निकम,सागर मोरे, राहुल रतन, दिलीपकुमार या कृषीदुतांचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे गावात स्वागत करण्यात आले. अभ्यासक्रमांतर्गत भंडारकवठे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती नवीन तंत्रज्ञान विविध पीक पद्धती ठिबक व तुषार सिंचनाचे फायदे मशागत नांगरणी,पेरणी, फवारणी ,कोळपणी आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.कृषिदुत यांनी अभ्यासलेली शेती ज्ञान व शेतकरी प्रत्यक्ष शेतीत घेत असलेला अनुभव यांची देवाणघेवाण यानिमित्ताने करणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमासाठी जून ते ऑक्‍टोबर कालावधीत शेतीतील आधुनिक पद्धती प्रात्यक्षिके शेती कामाचा प्रत्यक्ष अनुभव चर्चासत्रे आदीं कार्यक्रम कृषीदुतांमार्फत राबवले जाणार आहे.दरम्यान या कृषिदुत विद्यार्थ्यांची भंडारकवठे ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील सरपंच निंबाण्णा जंगलगी,ग्रा.स.मद्ण्णा लायने हणमंत पुजारी, चिदानंद कोटगोंडे,कल्लप्पा ससुलादी, गुरुनाथ अरकेरी, यल्लेश्वर बुधाले,सिद्धाराम पुजारी शिद्धगोंडा बूगडे, सुधाकर व्हनकोरे, नींगप्पा आवटे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.