माजी सभापती, नगराध्यक्षासह ६०० हून अधिक कार्यकर्ते भाजपात

0
28

गोरेगाव,दि.१८ :येथील विकास आघाडीला पाठिंबा देत भाजपने नगर पंचायतीचे सत्ता कब्जा केली.तेव्हापासून विकास आघाडी भाजपच्या वाटेवर असल्याची कुणकुण होती.विकास आघाडीचे प्रणेते हे गेल्या काही वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीला रामराम ठोकून बसले होते.परंतु राजकारणात सत्तेशिवाय काहीही नाही हे स्विकारत विकास आघाडीचे प्रमुख लक्ष्मीकांत बारेवार व त्यांचे पुत्र नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी(दि.१६)तालुका भाजप कार्यकारणीच्या वतीने आयोजित अभिनंदन मेळाव्यात गोरेगाव विकास आघाडीसह प्रवेश केला.
माजी सभापती लक्ष्मीकांत बारेवार व गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्या नेतृत्वात गोरेगाव नगरातील ६०० हून अधिक तसेच तालुक्यातील कार्यकत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी पक्षात प्रवेश करणाèया सर्व कार्यकत्र्यांचे स्वागत केले.कालच्या कार्यक्रमानंतर गोरेगाव येथे राजकिय घडामोडीत चांगलाच बदल घडून आला आहे. विशेष म्हणजे गोरेगाव नगर भाजपमय झाले आहे. तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने स्थानीक गुरुकृपा लॉन येथे अभिनंदन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले हे होते तर उद्घाटक म्हणून आमदार विजय रहांगडाले व अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, सिताबाई रहांगडाले, विश्वजीत डोंगरे,रोहिनी वरखडे, रेखलाल टेंभरे, योगराज पारधी,चित्रकला चौधरी, सुरेश रहांगडाले, दिलीप चौधरी,तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये गोरेगाव विकास आघाडीचे नगरसेवक, माजी सरपंच भोजराज बारेवार, अरविंद जायस्वाल, निती बारेवार, कुशन चौधरी या प्रमुख कार्यकत्र्यांचा समावेश आहे.नगरपंचायतीच्या काँग्रेसगटनेत्याच्या मुलानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.राज्यमंत्री फुके व आमदार रहागंडाले यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून विकास आघाडी भाजपात सहभागी झाली आहे.