टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना मान्यता

0
24

गोंदिया ,दि.19ः: जिल्ह्यातील गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील २४४ गावे आणि वाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विहीर खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोअर व नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.
यामध्ये गोरेगाव तालुक्यातील हिरापूर, साईटोला, हिरडामाली, पिंडकेपार, कन्हारटोला, सिलेगाव, पालेवाडा, बोरीटोला, हेटीटोला, गोंदेखारी, सोनेगाव, नवरगाव, पोवारीटोला, मेंगाटोला, स्कुलटोली (प्राथमिक शाळेजवळ) हौसीटोला, चांगोटोला, कन्हारटोला चोपा, बाघोली, बोरगाव, सुखपूर, उदयटोली, तेलनखेडी, आकोटोला, बबई, बबईटोला, घुर्मरा, मुसीबतनगर, कलपाथरी, महाजनटोला, चोपा, बाजारटोला, हिराटोला, चांदीटोला, कालीमाटी, घुबेटोली, आंबेतलाव, आंबेतलावटोला, कमरगाव, स्कुलटोली (जि.प.शाळेजवळ), दवडीपार, दवडीपारटोली, मोहाडी, घोटनटोली, इंद्रप्रस्थनगर, गणखैरा, गणखैराटोला, मिलटोली, संग्रामटोली, खाडीपार, चोपनटोली, चिल्हाटी, सलगटोला, टेंभरेटोली, शाळाटोली, मुरदोली, गराडा, जांभुळपाणी, सोदलागोंदी, मुंडीपार, सलगंटोला, कवलेवाडा, इसाटोला, पिपरटोला, सोनी, स्कुलटोली (ताराचंद कावळे यांचे घराजवळ), बाम्हणी, बोटे, म्हारीटोली ज्योतिबानगर, पुरगाव, सुकाटोला, मोहगाव (बु), सर्वाटोला, धुंदाटोला, डव्वा, डव्वाटोली, गोवारीटोली, तिमेझरी, स्कुलटोली (जि.प.शाळा), कटंगी (बु), वसंतनगर, शहारवानी, धानुटोला, मोहगाव/ति., तुमखेडा (बु.), स्कुलटोली (प्यारेलाल गौतम यांचे घराजवळ), मलपुरी, रामोटोला, पैकाटोला, तेढा, महाजनटोला, हलबीटोला (युवराज भंडारी यांचे घराजवळ), तिल्ली/मोह., गौरीटोला, परसाडीटोला, इंदिरानगर, तुमसर, खोसटोला, आडकुटोला, गोंडीटोला, आनंदनगर, गिधाडी, कवळीटोला, कॉलेजटोली, मीलटोली, बाजारटोली, म्हसगाव, तोरणटोली, घोटी, गयलाटोला, जानाटोला, आंबाटोला, कुर्‍हाडी, चौकीटोला, नवाटोला, हिरापुरटोली, आसलपानी, बोळुंदा, चांदीटोला, आलेबेदर, पाथरी, भुताईटोला, संजयटोली, निंबा, तानुटोला, हलबीटोला (दुर्योधन येळे यांचे घराजवळ), भडंगा, तेलीटोला, झांजिया.
तसेच गोंदिया तालुक्यातील कारुटोला, माकडी, दासगाव (बु), मानुटोला, मुरपार, रजेगाव, झालुटोला, खातीटोला, सोनपुरी, निलागोंदी, टिकायतपूर, पारडीबांध, खर्रा, ओझाटोला/पांगडी, आसोली, मुंडीपार (खु), झिलमिली, सिध्दीटोला, कटंगीटोला, सुदरटोली, घिवारी, छिपीया, काटी, बाजारटोला, चुलोद, मोरवाही, र्इी, दासगाव (खु), चुटीया, रायपूर, चंगेरा, शेरकाटोला, कोचेवाही, मरारटोला, सतोना, धामनगाव, नवरगाव कला, डागोटोला, बघोली, कलारीटोला, उमरी, दांडेगाव, हेटीटोला (गुदमा), रापेवाडा, फत्तेपूर, बरबसपुरा, दतोरा, नवरगाव (खु), बनाथर, जगाटोला, कासा, जिरुटोला, डोंगरगाव, किंडगीपार, लंबाटोला गि., पांजरा, हलबीटोला, ढाकणी, डांगोरली, सिवनी, तेढवा, बिरसी का., बंगाली कॅम्प, परसवाडा, चिरामनटोला, एकोडी, रामपुरी, निलज, सिरुपुर, सावरी, लोधीटोला, हलबीटोला, नागरा, कटंगटोला, कुडवा, लोहारा, गोंडीटोला, रामपहाडी, बिरसी दा., मरारटोला, हाबुटोला, रावणवाडी, गोंडीटोला, जब्बारटोला, खातीया, धामनेवाडा, कामठा, अंभोरा, गर्रा बु., गर्रा खु., गिरोला (पा.), हिवरा, भागवतटोला, तुमखेडा खु., पुजारीटोला, बिरसोला, भदयाटोला, नवेगाव धा., देवरी, खळबंदा, नवेगाव (पा.), नवाटोला, पांढराबोडी, तांडा, अदासी, लहीटोला, चारगाव या गावात निश्‍चित केलेल्या ठिकाणी सदर कामे करण्यात येतील. त्याचप्रमाणे गोंदिया तालुक्यातील माकडी व तांडा येथे नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील. अशा एकूण २६४ ठिकाणी ९१ लक्ष १७ हजार रुपयांमधून कामे घेण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.