इंदोरा आरोग्य केंद्रात रक्तगट तपासणी अहवालात रुग्णाची फसवणूक

0
21

गोंदिया,दि.30 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावळागोंधळ समोर आला असून रक्तगट तपासणी अहवालात ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने उघडकीस आला आहे.त्यातच रुग्णांच्या कुटुंबीयांच्या लक्षात सदर बाब आल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा चुकीच्या रक्तामुळे रुग्णाला जीव गमावण्याची वेळ आली होती.
तिरोडा तालुक्यातील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाèया सेजगाव येथील सरिता प्रेमलाल बिसेन ही महिला आरोग्य तपासणीसाठी १० दिवसापूर्वी केंद्रात गेली. तिथे तिची रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणीच्या अहवालात बी पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. पुढील उपचारासाठी २७ जून रोजी सदर महिला गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आली. रक्त लागत असल्याने पुन्हा गंगाबाई रुग्णालयात सरिताची रक्तगट तपासणी करण्यात आली. या तपासणीत सरिताचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. जर रक्तगट तपासणी न करता बी पॉझिटिव्ह रक्त लावले असते तर मोठी हानी होण्याचीही शक्यता होती. एकंदरीत आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या चुकीच्या अहवालाने महिला रुग्णांचा जीव टांगणीला आला होता. सुदैवाने गंगाबाई रुग्णालयात पुन्हा रक्तगट तपासणी झाल्याने आरोग्य केंद्रातील हा प्रकार उघडकीस आल्याने सदर रुग्ण महिलेच्या नातेवार्इंकानी आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर त्वरित कडक कारवाई करून नोकरीतून निलqबत करण्याची मागणी केली आहे.