दारुड्या पतीने केली मुख्याध्यापिका पत्नीची हत्या

0
38

गोंदिया,दि.02- तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापिकेची हत्या पतीनेच केल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.त्यामुळे शाळेत व गावात एकच खळबळ माजली आहे. मुख्याध्यापिका प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) यांचा कु?्हाडीने घाव घालून पती दिलीप डोंगरे यांनीच हत्या केल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसापासून मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीसोबत दिलीप डोंगरे यांचे भांडण सुरु होते.त्यामुळे ते एकमेकापासून विभक्त होत वेगवेगळे राहत होते.मुख्याध्यापिका प्रतिभा डोंगरे या दतोरा या गावात काही दिवसापुर्वीच आपल्या २ मुलीसोंबत राहायला गेल्या होत्या.एक मुलगी 11 वीत तर 1 आयटीआयमध्ये शिकत असल्याचे वृत्त आहे.घटनेच्यावेळी शाळेत १ ते ५ पर्यंतचे वर्ग असून घटनेच्यावेळी शेजारील वर्गखोलीत एक शिक्षिका या वर्गात मुलांना शिकवत होत्या.ओरडण्याच्या आवाज येताच मुले आणि शिक्षिका मुख्याध्यापिकेच्या खोलीकडे गेल्या असत्या त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व त्यांचे पती हे पळून जातांना दिसले.पती दिलीप डोंगरे हा दारुच्या आहारी गेलेला असून नेहमी पैशाची मागणी करुन मारहाण करायचा अशी माहिती समोर आली आहे.

या त्रासाला कटांळूनच प्रतिभा डोंगरे यांनी इर्रीटोला येथून ३ किलोमीटरवरील दतोरा येथे भाड्याचे घर घेऊन राहण्यास सुरवात केली होती. घटनास्थळी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नारनवरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनकर ठोसेर हे दाखल झाले असून फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.दरम्यान आरोपी पतीने आत्महत्या केल्याच्या चर्चांना उधाण आले असले तरी पोलिसांना मात्र अद्यापही यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.