‘युवा माहिती दूतांमार्फत शासकीय योजनांची जनजागृती’ रासोयो विद्यार्थ्यांचा शासनाला मदतीचा हात

0
11

गडचिरोली, दि.६: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राज्यात ङ्कयुवा माहिती दतांमार्फत ङ्क ग्रामीण भागात शासकीय योजना पोहचविण्याचे काम सुरु आहे. या अभियानातून गडचिरोली जिल्हयातील पहिली बॅच कृषि महाविद्यालयाचा असून आज त्या ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, कृषी विद्यापीठाचे प्राचार्य श्रीकांत अमरशेट्टीवार, ङ्कअनुलोमङ्क संस्थेचे उपविभाग प्रमुख संदिप लांजेवार, कृषी विज्ञान व केंद्राचे समन्वयक संदिप कऱ्हाडे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा.हर्षा मेंढे भाग जनसेवक शेषराव कोहळे व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
यावेळी राज्य शासनाकडून युवा माहिती दूत निवड प्रक्रिया व अंमलबजावणीबाबत संदिप लांजेवार यांनी माहिती दिली. युवा माहिती दूताची निवड कशा प्रकारे केली जाईल व शासनाचे युवा माहिती ॲप कसे वापरावे याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.
युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ङ्कयुवा माहिती दूतङ्क उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यत थेट देणे, हे युवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट देणे, हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्टय असून या उपकमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना किमान एक कोटी नागरिकांपर्यत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्राचा कालावधी दि. ३१ ऑगस्ट २०१९ पर्यत आहे.
यासाठी शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांची निवड करण्यात आली असून या योजनांची माहिती युवा माहिती दुतांमार्फत प्रस्तावित लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.युवा माहिती दूत प्रक्रियेमध्ये विविध विद्यालय महाविद्यालयामध्ये ङ्कयुवा माहिती दूत मार्गदर्शकङ्क म्हणून एका शिक्षकाची नेमणुक केली जाणार आहे. मदतीने ङ्कयुवा माहिती दूतङ्क निवडले जाणार आहेत. शासनाने तयार केलेल्या एका ॲपद्वारे ङ्कयुवा माहिती दूतङ्क प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ङ्कयुवा माहिती दूतङ्क ॲप मध्ये दूतामार्फत कुटूंबभेटी दरम्यान मिळालेली माहिती भरावयाची असून यावेळी युवा माहिती दूत त्यांना ॲपमध्ये पाहून विविध योजनांची माहिती देणार आहे.कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या कार्यशाळेत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी नागरीकांशी कसा संवाद साधावा, गृहभेट कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत माहिती दिली. तर अनुलोम संस्थेचे संदिप लांजेवार यांनी कार्यशाळेचे प्रास्तावीक केले. तर संचालन शेषराव कोहळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पायल करमे, चंद्रशेखर चंदनखेडे, ज्वेता करमे, झिन्नत सय्यद, रुपाली मडावी यांनी सहकार्य केले.