यंदाची विधानसभा सर्वसामान्य शेतकऱ्याने लढायलाच हवी….?

0
10

भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण सर्वजण बघत आलेलो आहे की, शेतकऱ्यांचा विकास अजून खुंटतच चाललेला आहे.शेतकऱ्यांच जगणं म्हणजे एका अनाथांच जगणं झालेलं आपल्याला दिसून येत आहे.या मागचं प्रमुख कारण म्हणजे ‘राजकारणच‘ होय. म्हणजेच याचा विचार आपण सखोल असा केला तर खरोखरच आपल्याला राजकारणच शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं प्रमुख काम करतांना सर्वांनाच दिसून येत आहे.जो तो पुढारी आपापला खिसा भरण्याचं काम करताना दिसत आहे.म्हणजेच काही पुढाऱ्यांच्या शिक्षणसंस्था, कारखाने,जमिनी,शाळा अशी अनेक उपजीविकेची साधने त्यांच्या मालकीची आहे.आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे,परंतू याच लोकशाहीचा गैरफायदा मोठं मोठे उद्योगपती, कारखानदार राजकारणाचा मोठा फायदा घेतातच आहे.यासाठीच आता शेतकरी जागा झालाच पाहिजे…!तरच शेतकऱ्यांचं जगणं आनंदमय आणि सुखकर होण्यासाठी शेतकऱ्याने एकजुटीने राजकारण या विषयाकडे गांभीर्याने बघून प्रत्येक भागांतून कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेऊन राजकारणांच्या रिंगणात उतरणे अत्यंत आवश्यक झालेले दिसून येत आहे.जर असे झाले तर नक्कीच अन्नदाता सुखी भव:व्हायला एक मिनिटे सुद्धा वेळ लागणार नाही आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य जनता आपल्या गरजा भागविण्यासाठी जीवनोपयोगी वस्तू खरेदी करताना सतत कर भरते आणि त्याचाच नफा काढून प्रशासन अडचणीत आलेल्या जनतेला मदत करत असते.परंतू यामध्ये सर्वात जास्त नफा जे लोक देश चालवत आहेत त्यांच्याच खिशामध्ये तो नफा जात तर नसेल ना…..?याचा अभ्यास शेतकऱ्याने करणे आवश्यक आहे.जर शेतकरी एकजूट होऊन राजकारणात उतरला तर नक्कीच शेतकऱ्यांना कुणापुढे हात पसरविण्याची वेळच कधी येणार नाही…कारण दुष्काळ पडल्यास शेतकरी उमेदवार मंत्रिमंडळात असेल तर तो स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय देईल..!

लेखक-योगेश तुळशीराम मोरे,
मराठी साहित्यिक तथा गीतकार संगीतकार,औरंगाबाद
दुरध्वनी क्र.७९७२२१५५६८