विद्यार्थ्यांसाठी “ट्रायबल सिक्युरिटी फोर्स” निर्माण करणार – डॉ.परिणय फुके

0
8

मुंबई दि. 19: राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टिने त्यांच्यातील शारिरीक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विदयार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून या विदयार्थ्यांसाठी “ट्रायबल सिक्युरिटी फोर्स” निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली.
आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे उप सचिव. लक्ष्मीकांत ढोके, आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या आयुक्त श्रीमती नंदीनी आवाडे तसेच “इंडियन आय सिक्युरिटीचे” प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. फुके यावेळी म्हणाले की, “ट्रायबल सिक्युरिटी फोर्स” निर्माण करण्याबाबत आवश्यक असलेला प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावा. आदिवासी विद्यार्थ्यांचे शरीर मुळातच काटक असल्याने त्यांना शारिरीक क्षमतेवर आधारित रोजगार उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिक/ पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी शारिरीक प्रशिक्षण दिल्यास त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. वन सुरक्षा गार्ड, होमगार्ड, खाजगी सिक्युरिटी संस्था, आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा/वसतीगृह येथे सुरक्षा रक्षक म्हणून भरती होण्यास हे विदयार्थी पात्र ठरतील