युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करुन देणार ; आ. अग्रवाल

0
9

गोंदिया,दि.19 : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघात विविध कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्या कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे.रामनगर येथे गौसिया मश्जिद शादीखाना,पिपरटोला येथील लोकांना सात बाराचे वितरण,परमात्मा नगरात रस्ताचे बांधकाम,बायपास रस्ता आदी कामाचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना  शहराला स्मार्ट सुंदर पूर्ण सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने आपले प्राणामिक प्रयत्न सुरु आहेत. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. युवकांना रोजगारभिमुख शिक्षण मिहावे यासाठी गोंदिया येथे तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु करण्यात आले. यापुढेही जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिली. शहरातील परमात्मा एक नगर येथे ५० लाख रूपयाच्या निधितून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या बाांकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने नगरसेवक शकिल मंसूरी,सुनिला भालेराव, विनोद जैन,पृथ्वीपालसिंह गुलाटी,राकेश ठाकुर, आलाेक माेहतीं, जहीरभाई अहमद, जलील पठान, बाळकृष्ण पटले, धनलाल ठाकरे, शोभेलाल पारधी उपस्थित होते.आ. अग्रवाल म्हणाले शहरातील जुन्या जीर्ण उड्डाणपुलाची समस्या ओळखून शासनाकडे पाठपुरावा करून नविन उड्डाणपूल बांधकामासाठी ८३ काेटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला लवकरच पुलाच्या बांधकामला सुरूवात केली जाणार आहे. शहराच्या सर्वागिंण विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.