भंडारा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये साकोली विधानसभेकरिता सर्वाधिक अर्ज

0
22

भंडारा,दि.01ः- लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्शवभूमीनंतरही काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता तिकीट मागणाऱ्या इच्छुकांची रांग लागल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात दिसून आले.भंडारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदारसंघाकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात सर्वाधिक १९ साकोलीतून तर भंडारा १६ व तुमसरमधून १४ इच्छुक उमेदवारांनी अर्ज करुन मुलाखती दिल्या.येथील साखरकर सभागृहात झालेल्या मुलाखतीच्या अध्यक्षपदी भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर हे होते. तर निरीक्षक म्हणून नागपूरचे माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार डॉ अविनाश वारजूरकर तसेच पार्लियामेंट्री बोर्डात बंडूभाऊ सावरबांधे, रमेश डोंगरे, सेवकभाऊ वाघाये, आनंदराव वंजारी, मुजीबभाई पठाण, जिया पटेल, प्रमिलाताई कुटे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमाताई भुरे, युवराज वासनिक, रणवीर भगत, राकेश कारेमोरे, पवन वंजारी, आवेश पटेल, सुरेश मेश्राम, रमेश खराबे, महेंद्र निंबार्ते इत्यादींचा समावेश होता.

यावेळी काँग्रेस मुलाखत समितीमधील  जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये सोबत अनेकांनी मुलाखती दिल्या. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. भंडारा जिल्ह्याकरिता माजी खासदार गेव्ह आवारी ,माजी आमदार अविनाश वारजूरकर, चंद्रपूर यांची नेमणूक केली होती. सदर निरीक्षक झालेल्या मुलाखतींचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत.त्यात प्रत्येक विधानसभाक्षेत्रातून पाच नावे पाठविण्यात यावेत असा निर्णय पार्लियामेंटरी बोर्डाने घेतल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिली. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसचाच विजय होणार असा आशावाद प्रेमसागर गणवीर यांनी व्यक्त केला, काँग्रेसमुक्त भारत करता-करता, काँग्रेसयुक्त भाजपा होत चालल्याचा टोलाही त्यांनी लगावला.  संचालन मुकुंद साखरकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव तसेच जिल्हा माध्यम समन्वयक महेंद्र निंबार्ते यांनी केले. कार्यक्रम यशश्वी होण्याकरिता जिल्हापरिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे आनिक जमा पटेल, प्रशांत देशकर, मंगेश हुमणे, गजानन मोहरकर, गौतम नागदेवे, सचिन फाले, धर्मेंद्र गणवीर, नाहिद परवेझ, शाहीन मून, रोशन दहेलकर, आकाश मेश्राम इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.