जयंत निमगडे गडचिरोली प्रेसक्लबचे अध्यक्ष, रूपराज वाकोडे सचिव

0
51

गडचिरोली,दि.09ः येथील गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ‘आकाशवाणी’चे अर्धवेळ वार्ताहर तथा ‘गडचिरोली वार्ता डॉट कॉम’चे संपादक जयंत निमगडे यांची, तर सचिवपदी दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे यांची निवड करण्यात आली.
गडचिरोली प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रेस क्ल्ब भवनात बुधवारी (दि.७) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष सुरेश नगराळे (सकाळ,), सहसचिव नीलेश पटले (लोकशाही वार्ता), कोषाध्यक्ष शेमदेव चाफले (युवाराष्ट्र दर्शन), सदस्य सर्वश्री मनोज ताजने (लोकमत), प्रा. अनिल धामोडे (देशोन्नती), अरविंदकुमार खोब्रागडे (नवराष्ट्र/नवभारत), रोहिदास राऊत (हितवाद), नंदकिशोर काथवटे (तरुण भारत), अविनाश भांडेकर (पुण्यनगरी), मारोतराव मेश्राम (युगधर्म), प्रा. सुरेश सरोदे, सुरेश पद्मशाली (आदिवासी माणुस) व विलास दशमुखे (गडचिरोली पत्रिका) यांचा समावेश आहे.