अदानी फाऊंडेशनच्या ‘आमची शाळा-आदर्श शाळा’ स्पर्धेचे सीईओच्या हस्ते पुरस्कार वितरण

0
33

तिरोडा,दि.09ः- अदानी फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळाकरिता राबविण्यात येत असलेली ‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धा शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रेरणादायी असून या स्पर्धेच्या माध्यमाने लोकसहभागातून शाळांचा कायापलट होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ही स्पर्धा चालू शैक्षणिक सत्रामध्ये राबविण्याकरिता शिक्षण विभाग पुढाकार घेणार असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
ते अदानी फाऊंडेशच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पध्रेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. आमची शाळा, आदर्श शाळा स्पध्रेत सन २0१८-१0 मध्ये तालुक्यातील ३३ शाळा शाळा सहभागी झाल्या होत्या. त्या शाळांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच २0१९-२0 मध्ये सहभागीय ६0 जि.प. शाळांकरीता स्पध्रेचा उद््घाटन सोहळा अदानी पावर तिरोडा येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने अदानी पावर प्रमुख सी.पी. साहू, रोहन घुगे, जिल्हा शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे, तिरोडाचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी व अदानी फाऊंडेशनचे हेड नितीन शिराळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकातून नितीन शिराळकर यांनी ‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धा राबविण्याबाबत उपस्थितांना भूमिका समजावून सांगितली. तसेच अदानी फाऊंडेशनच्या इतर शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच अदानी पावर प्रमुख सी.पी. साहू यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात अदानी फाऊंडेशन सदैव तत्पर राहील व आमची गुणवत्ता वाढीकरिता नेहमी सहकार्याची भूमिका राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे यांनी जिल्ह्यामध्ये अदानी फाऊंडेशनद्वारा राबविण्यात येणारे उपक्रम हे स्तुत्य असून विजेता शाळांचे अभिनंदन केले. तसेच गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी सुद्धा विजेता शाळांना शुभेच्छा दिल्या.
आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा २0१८-१९ मध्ये तालुकास्तरावर विजेता शाळा प्रथम क्रमांक जि.प. उच्च प्राथ. शाळा अत्री, द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथ. शाळा भजेपार व तृतीय क्रमांक जि.प. उच्च प्राथ. शाळा मुंडीकोटा यांना अनक्रमे १ लाख, ७५ हजार व ५0 हजार रूपयांचे शैक्षणिक साहित्य पुरस्कार स्वरूपात पारितोषीक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर केंद्र स्तरावर जि.प. उच्च प्राथ. शाळा खैरलांजी, बोदा, इंदोरा बु., बेलाटी बु., मनोरा व चिखली या दहा शाळांना १५ हजार रूपयांचे शैक्षणिक साहित्य पारितोषीक स्वरूपात, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अदानी फाऊंडेशनचे राहुल शेजव तर आभार प्रीती उके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदानी फाऊंडेशनच्या सर्व कर्मचार्‍यांनी तसेच शिक्षण विभागाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले