२0 ऑगस्टचा राज्यव्यापी लाक्षणिक संप यशस्वी करा

0
18

गोंदिया,दि.09ः- सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, राज्य समन्वय समितीने २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा लाक्षणिक संप एकजुटीच्या ताकदीने यशस्वी करण्याचे आवाहन  अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी केले.संपाचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात राज्य सरचिटणीस व जिल्हा निमंत्रक लिलाधर पाथोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
सभेस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे आशिष प्र रामटेके सहसचिव (राज्यस्तर),राजेश मेनन अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे,सचिव शैलेश बैस,ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,जुनी पेंशन हक्क संघटना अध्यक्ष राजेंद्र कडवं तसेच सचिव सचिन राठोड,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष आर. आर. मिश्रा,सचिव नरेंद्र रामटेककर,परवेज सैय्यद अध्यक्ष पशु चिकित्सक संघटना,गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,राजानंद वैद्य,हरीराम येळणे,विस्तार अधिकारी विनोद चौधरी,कार्तिक चव्हाण,तुळसीदास झंझाड़,अजय कोठेवार,नेवारे,डी.एस.लोहबरे, तसेच सर्व राज्य शासकीय / जिल्हा परिषद कर्मचारी / शिक्षक / शिक्षकेतर संघटनानाचे अध्यक्ष / सचिव / पदाधिकारी उपस्थित होते.