आ.पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर

0
17

देवरी,दि.10 : आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून आपला वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने आ. संजय पुराम मित्र परिवाराच्या वतीने आमगाव विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यात नेत्र तपासणी व चष्मे वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २५00 नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. सोबतच मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबिरासोबत अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करून जनसेवेसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये उपस्थित रुग्णांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.
स्व. सुषमा स्वराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुठलेही स्वागत किंवा शुभेच्छा स्वीकारणे नाकारल्या गेले. तर सुषमा स्वराज यांना सामूहिक र्शद्धांजली देण्यात आली. विधान परिषद सदस्य आ. अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर माजी आ. केशवराव मानकर, संघटन महामंत्री वीरेंद्र अंजनकर, मंडळ अध्यक्ष प्रमोद संगीडवार, न.पं. अध्यक्ष कौशल्या कुंभरे, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, न.पं. उपाध्यक्ष आफताब शेख, पं.स. सभापती सुनंदा बहेकार, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, ठाणेदार प्रमोद घोंगे, महेश जैन, जि.प. सदस्य सरिता रहांगडाले, संतोषकुमार तिवारी, महेंद्र मेर्शाम, गणेश सोनबोईर, राजेश चांदेवार आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ५ हजार रुग्णांची आरोग्य व नेत्र तपासणी करून २५00 रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते चष्मे वितरण करण्यात आले. आपल्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजशील उपक्रमाचे आयोजन करून जनसेवेत वाढदिवस साजरा केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष महामंत्री विनोद भेंडारकर यांनी केले तर आभार प्रवीण दहीकर यांनी मानले.