कोल्हापूर-सांगली-,सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करा-आ. राम रातोळीकर यांचे आवाहन

0
14

नांदेड,दि.13: सध्या राज्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यानी थैमान घातले आहे. यात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात वितहानी झाली. अशा आकस्मिक संकटाला जनतेनी धैर्याने तोंड दिले. परंतू या महाप्रलयंकारी पुरामुळे नुकसान झालेल्या अपदग्रस्तांना मदत देण्यासाठी  भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेनी सुध्दा पुढे यावे. आणि सर्वांनी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुराने अक्षरशः थैमान घातले. चाळीसच्या वर लोकांचे प्राण गेले. अनेक पुरात बेपत्ता आहेत. मोठी वित्तहानी झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर अनेकांचे संसार पुराच्या पाण्याने उद्धवस्त झाले आहेत. शासन त्यांच्या स्तरावर मदत तर करतच आहे. पण सामाजिक भावना जागृत करून प्रत्येकाने या कामी हातभार लावणे आवश्यक आहे. भाजपाचे कार्यकर्तेही यासाठी पुढाकार घेत आहेत.
जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतः व मदतफेरी काढून जमेल तेवढा मदत पुरसग्रस्तांना पाठवत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी करत नागरिकांनीही याकामी सहकार्य असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर यांनी केले आहे.
सोमवारी नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने मदतफेरी काढून मदतीचे आवाहन करण्यात आले. यावेळी आ.राम पाटील रातोळीकर, भाजयुमो राज्य प्रभारी संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष रवि पाटील खतगावकर, महानगर अध्यक्ष सोनू कल्याणकर, बाळासाहेब देशमुख, जिल्हा सरचिटणीस अरुण सुकळकर, अँड.रावसाहेब देशमुख, विनोद देशमुख, प्रताप पावडे, नागनाथ पाटील, राजेश देशमुख संदीप कर्हाळे, बाळासाहेब बोकारे, अभिलाष नाईक, प्रा.कैलास पौळ, संदीप पावडे आदी उपस्थित होते.