मुख्य बातम्या:

मोहम्मद रफी व किशोरकुमार यांना आदरांजली

– मनोरंजन सांस्कृतिक संस्था व सरस्वती म्युझिकल ग्रृपचे आयोजन
गोंदिया,दि.13 : : येथील मनोरंजन सांस्कृतिक संस्था व सरस्वती म्युझिकल ग्रृपच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द गायक स्व.मोहम्मद रफी व किशोरकुमार यांच्या स्मृतीत संगीतमय गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
भवभूती रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, जुगलकिशोर अग्रवाल, नगरसेविका नेहा नायक,  प्रकाश अग्रवाल, प्रेमनाथ दीप, विनोद शरणागत,  तिलक दीप, साजन दीप आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तिलक दीप, किरण भट्ट, धर्मेंद्र नायर, विजया मॅडम, वीणा नायक, राजू सोनी, साक्षी कन्हाई यांनी मोहम्मद रफी व किशोरकुमार यांची सदाबहार गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुध्द केले. विशेष म्हणजे, यावेळी नगराध्यक्ष इंगळे यांनीही ‘qजदगी कैसी ये पहेलीङ्क हे सदाबहार गाणे गाऊन सर्वांची मने qजकली. या संगीतमय कार्यक्रमाला आर्गन प्लेअरवर धीरज ठाकूर, गुलशन दीप, गिटारवर पारस दीप, हेमंत पंडा, पॅडवर राजेश नायक, नरेंद्र नायक, qपटू तांबे, ढोलकीवर धीरज डोंगरे, देवराज सोनी, राहूल दीप यांनी संगीतसाथ दिली. यावेळी नेक्स स्टेप डाँस अकादमीच्या शोभना दीप, मनाली मुरकुटे, आकाश नेवारे, निखिल दहिया आदींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमाणी दीप व प्रशांत वेरुळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज अग्रवाल, विजय सोनी, गौरव चौरसिया, विनोद बिरणवार, अतुल सतदेवे, भाविक, सरस्वती दीप आदींनी सहकार्य केले.

Share