मुख्य बातम्या:

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार असणे देशहिताचे : विनोद अग्रवाल

गोंदिया ,दि.१३.:: देशाच्या सर्वांगीण विकासाठी काँग्रेस ने योजना तर खूप आणल्या पण त्या प्रत्यक्षात न उतरवता फक्त कागदावरच ठेवल्या आणि लाभ पण अशा लोकांनाच दिला जे लोक काँग्रेसचे संबंधित आहेत. मात्र २०१४ ला प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांचे सरकार येताच योजना फक्त कागदावर राहिल्या नाही तर जनतेला त्याचा लाभ देखील मिळाला. जनतेच्या खात्यात थेट लाभाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोचणे सोपे झाले असून आता गावागावात कॉमन सर्व्हिस सेंटर च्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी जनतेला सुविधा मिळत आहेत. अशा सर्वसमावेशी, पारदर्शी सरकार देशाच्या हिताचे असून केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे पूर्व उपाध्यक्ष तसेच गोंदिया भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष श्री विनोद अग्रवाल यांनी केले. ग्राम कान्हरटोला येथे २५/१५ योजने अंतर्गत ५.५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकार्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंदिया भाजप चे जिल्हा महामंत्री भाऊरावजी उके सुद्धा उपस्थित होते.

या वेळी उपसरपंच किर्तीलालजी नागपुरे, महेशजी शहारे, माजी तंटामुक्ती सामिती अध्यक्ष हंसलालज बघेले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कन्हैया चचाने, रमेश चचाने, रामलाल दबारे, मोहनलाल तुरकर, दाऊजी तुरकर, दिलीप नागपुरे, नांनु आंबेडारे, ओमेश्वर बघेले, मोतीलाल मांडीया, यशवंत नागपुरे, संतोष आंबेडारे, अक्षय पटले, सुनील पगरवार, शांताराम शहारे, बाबूलाल बघेले, राजु तुरकर, दुर्गेश नागपुरे, निरज तुरकर, शैलेश तुरकर, संदीप तुरकर, शैलेश मेहर, राजेश चुलवार, विलास मेहर, भुमेश नागपुरे, गुनेश नेवारे, पवन दाबारे, रंगलाल नागपुरे, रणजित आंबेडारे आणि मोठ्यासंख्येने गावकरी बांधव उपस्थित होते.

Share