दिव्यांगांच्या विकासासाठी ‘अपंग कल्याण राखीव निधी’ खर्च करण्यात येईल-नगराध्यक्षा योगिता पिपरे

0
27
गडचिरोली,दि.16- नगरपरिषदेने अपंग कल्याण निधीमधून सन 2016-17 व 2017-18 या कालावधीत 4 लाख 50 हजार रूपये विकलांग लोकांना सरळ मदत म्हणून दिली आहे. सन 2018-19 व 2019-20 मधील अपंग कल्याण निधीमधून विकलांगांचा विमा नगरपरिषद काढणार आहे. विकलांगांना मिळणारी रक्कम बॅंकेत त्यांच्या खात्यात जमा करण्यात  येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या विकासासाठी व कल्याणकारी योजनांसाठी अपंग कल्याण राखीव निधी खर्च करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
शहरातील बालाजी वार्डात विकलांग सेवा संस्था शाखा गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन व स्वयंचलित तीन चाकी सायकीलचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.विकलांग सेवा संस्था शाखा गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन व मनोहर गेडाम या दिव्यांगाला स्वयंचलित तीनचाकी सायकीलचे वाटप नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा अपंग आघाडीचे अध्यक्ष मुकुंदराव उंदीरवाडे, सुभाष टेटवार, श्रीराम पानेरकर, खुशाल ठलाल, अशोक खाडे, सुधाकर कामडी, रविंद्र झाडे उपस्थित होते.यावेळी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांविषयी व विमा योजनेविषयी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी माहीती देऊन मार्गदर्शन केले.कर्यक्रमाचे संचालन व आभार संजय डाखोळे यांनी केले. यावेळी सुरज गेडाम, बंडू भांडेकर, राजेंद्र कोलते, धीरज शेणके, रोहीत लाकडे, दिलीप टेकाम, मनोहर गेडाम, सुशिल पराते, रेखा पराते, रविंद्र झाडे, राजपाल गायमुखे, सुषमा रामटेके, तुळशिदास पुडके, शालु करकाडे, विमल धुळसे, पवन कोटगले, रष्मा कुमरे, अपुर्वा समर्थ उपस्थित होते.