२५० विद्यार्थ्यांचा राखी मेकिंग स्पर्धेत सहभाग

0
9

गोंदिया :  शहरातील नूतन इंग्लीश शाळेत रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता यावी, त्यांना शिक्षणातून स्वयंरोजगाराचे धडे लहानपणापासून मिळावे. या उद्देशाने राखी तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांनी कागद, विविध प्रकारचे धागे, स्टोन, एयरबड्स, कॉटन, चार्ट पेपर आणि इतर वस्तूंचा वापर करून शाळेतच सुंदर राख्या तयार केल्या. स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून तिरंगा ध्वजातील तील रंगांचा वापर करून देखील राख्या तयार केल्या. या उपक्रमाविषयी प्राचार्य ज्योती बिसेन म्हणाल्या, रक्षाबंधणाचा सण १५ ऑगस्ट रोजी आहे. स्वत:च्या हाताने तयार केलेली राखी भावाला बांधण्याचा आनंद वेगळात असतो. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाविषयी शाळेचे अध्यक्ष अमृत इंगळे म्हणाले, राखी हा सण बहिण आणि भाऊ यांचे नाते घट्ट करणारा आहे असे सांगीतले. यावेळी विद्या चटर्जी , पूनम माहुले , मंजू बैरागी, अर्पिता  गाडेकर आदी उपस्थित होते.