कार्यकर्त्यांनो, कामाला लागा-खा. पटेल

0
18

भंडारा,दि.18ः- शासनाने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. सुशिक्षित बेरोजगारांना मागील पाच वर्षात कोणताही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. मेगा भरतीच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगारांच्या जिवनाशी खेळ मांडलेला आहे. अजुनपयर्ंत कोणतीच शासकीय भरती केली नाही. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढून फक्त प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौर्‍यावर येवून जिल्ह्यातील जनतेस कशाचीही मदत न करता फक्त पक्षाचा प्रचार करून गेलेत. ज्या नेत्यांनी पक्ष सोडला त्यामुळे कोणताही पक्ष संपत नसतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. जनतेचे कामे करण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहील, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीच्या  विस्तारित कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँंग्रेसची लवकर बैठक होणार असून लवकरच सीट वाटप करण्याची प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी केले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार अनिल बावनकर, अभिषेक कारेमोरे, देवंेद्रनाथ चौबे, रामलाल चौधरी, धनंेद्र तुरकर, अँड. विनय पशिने, नरंेद्र झंझाड, बालु चुन्ने, देवचंद ठाकरे, वासुदेव बांते, यशवंत सोनकुसरे, नितीन तुमाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.