‘मस्सकली’ संस्थेतून पैठणीची कला संस्कृती अधिक मजबूत करण्याचा श्रद्धा सावंत यांचा प्रयत्न

0
176

हाताने बनविणाऱ्या पैठणी निर्मात्यांची म्हणजेच विणकामगारांची कला आपल्यापर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या या कलेला पुनर्जीवित करण्यासाठी उदरनिर्वाह मदत म्हणून महाराष्ट्राची प्रतिभावान डिझायनर श्रद्धा सावंत त्यांच्या ‘मस्सकली’ या संस्थेच्या अंतर्गत विणकारांच्या निरनिराळ्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास सज्ज झाल्या आहेत. श्रद्धाच्या आणि तिच्या संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या विणकलाकारांच्या आयुष्याला अनुभवता यावे पैठणी बनण्याच्या या प्रक्रिया तुम्ही जवळून जाणून घेण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी श्रद्धा म्हणतात की, “पैठणी विणकारांचे आयुष्य सोपे नाही. एका बाजूला अभिमान वाटावा ही अशी कला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या कलाकाराचे संपूर्ण कुटुंब आहे जे त्यांच्या या कार्यभारावर अवलंबून आहे. ‘मस्सकली’ च्या साहाय्याने मी या साऱ्या कलाकारांना ही कला पुढे सुरू ठेवण्यास मदत होईल यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि जेव्हा तुम्ही या हातमागयंत्रावर स्वतः ही प्रक्रिया अनुभवाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील ताणतणाव, अडथळे काही वेळातच समजतील. ”
हे प्रदर्शन २४  ते २५ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत मुंबईच्या जुहू स्थित पंचतारांकित हॉटेल नोवोटेल येथे भरविण्यात येणार आहे. तर अश्या या अनोख्या प्रदर्शनाचा आणि महाराष्ट्राच्या उज्वल कलाकृतीचा ‘ताणा बाणा’ अनुभवण्यास आणि आपल्या या कलाकारांस साथ देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन श्रध्दा यांनी केले आहे.
भारताचा हँडलूम उद्योग हा जगातील सर्वात जुना पारंपरिक उद्योगच नाही तर शेतीनंतरचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील दुसऱ्या क्रमांकाचा वाटा असणारा उद्योग आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगभरातून भारतात ५९ टक्क्यांहून अधिक हाताने विणलेला माग आहे आणि त्यातही जवळ जवळ ९५% हँडलूम कापडांची निर्माती होते. हँडलूम कपड्यांमधील सर्वात सुंदर आणि आकर्षक कलाकृती म्हणून ‘पैठणी’ला विशेष मान आहे. हाताने विणलेली, उत्तम डिजाईन असलेली पैठणी केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपला ठसा टिकवून आहे.
पैठणीच्या सुंदरतेइतकाच त्याचा निर्मितीची प्रक्रिया आणि इतिहासही तितकाच रोचक आहे. महाराष्ट्रातील पैठण येथून यादवांच्या काळात उगम पावलेल्या पैठणीच्या निर्मितीत चक्क अस्सल सोने आणि च आताच्या काळात मात्र ही कलाकृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हातमागावर बनणाऱ्या या साडीची निर्मिती किंमत अधिक असल्याने पैठणी महाग असते आणि म्हणूनच यामानाने स्वस्त असणाऱ्या प्रतिकृती पैठण्या आता बाजारात दिसू लागल्या आहेत. या पैठणी विणकलाकारांसोबतच आणखी २५ विणकलाकारांचा समावेश श्रद्धा सावंत यांनी यात केला आहे. हे सारे कलाकार केवळ पैठणीच नाही तर बनारसी, खादी-जमदानी, चंदेरी, कांजीवरम, इकत, गरहवाल अशा वेगवेगळ्या ५०० हून अधिक भारतीय हँडलूम साड्यांचे प्रकार येथे आढळतील.
श्रद्धा सावंत म्हणतात की, “खादी हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे आणि हातमाग विणकाम हा गांधीजींच्या स्वावलंबनाच्या तत्वज्ञानाचा एक प्रमुख घटक होता. आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी व ग्रामीण रोजगार पुरवण्यासाठी हातमाग उद्योग एक वाहन आहे. मस्सकली च्या माध्यमातून मी माझ्या छोट्याशा मार्गाने दंडात्मक स्थितीत असलेल्या परंपराधारकांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच भारताचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा – त्याची विणण्याची कला यांचे प्रतीक परत आणण्याचा प्रयत्न करीत आहे.”
परंपरा नामशेष होण्यापूर्वी विणण्याच्या कलेस नवीन आर्थिक ऑक्सिजन देणे गरजेचे आहे.