पोलीस विभागाच्या ‘प्रयास’ उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0
11

गडचिरोली,दि.24ः- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात  २३ ऑगस्ट रोजी ‘प्रयास’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा -२0१९ घेण्यात आली. या स्पध्रेत जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील १0२ आश्रमशाळांतील तब्बल २१ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २0१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत १0 सामान्य ज्ञानाचे प्रश्न व्हॉट्सअँपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. सदर शिक्षकांमार्फत सदरचे प्रश्न दैनंदिन परिपाठाच्या माध्यमातून त्यांचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात येत होते. या सर्व प्रश्नांतून ५0 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा परीक्षेत देण्यात आली होती.
या तिमाही परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांस ३१00 रुपये, प्रमाणपपत्र, द्वितीय क्रमांकांने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांस २१00 रुपये व प्रमाणपपत्र, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांस १५00 रुपये व प्रमाणपपत्र तसेच क्रमांक ४ पासून पुढील २२ विद्यार्थ्यांंना प्रत्येकी ५00 रुपये व प्रमाणपपत्र. आणि प्रत्येक आश्रमशाळेतून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांस प्रोत्साहनपर म्हणून २00 रुपये व प्रमाणपपत्र देण्यात येणार आहे.
नक्षल प्रभावित अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्याच्या लोकशाही व शांततेच्या मार्गाने विकास कसा साधला जाईल, या करिता गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील आर्शमशाळेतील विद्यार्थ्यांंचा सर्वांंगीण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे बौद्धीक कला-गुणांना वाव मिळून त्यांन स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, भविष्यातील प्रशासकीय अधिकारी घडविण्यासाठी सदर उपक्रमाची सुरुवात पोलीस विभागाने केली आहे. स्पध्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांंना तसेच स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.