शासनाच्या कल्याणकारी योजना अंतीमव्यक्ती पर्यंत पोहचविणे हाच ध्यास-आ. बडोले

0
19

राधेश्याम भेंडारकर/अर्जुनी मोरगाव_-: जनतेला मूलभूत सुविधांसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना तयार करणे हे सरकाचे कर्तव्य आहे. निर्माण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी हे दूताचे काम करतात. प्रत्येक योजनेचा लाभ हा समाजातील अंतिम घटका पर्यंत पोचविणे व त्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी कटिबद्ध असून हाच माझा ध्यास असल्याचे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
ते स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तहसील कार्यालया तर्फे आयोजित जनसंवाद सभेमध्ये बोलत होते. आ. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पंस सभापती अरविंद शिवणकर,कृउबास सभापती कासीम कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर,नामदेव कापगते, केवळराम पुस्तोडे,उमाकांत ढेंगे,प्रकाश गहाने, तहसीलदार विनोद मेश्राम,बीडीओ मयूर अंदेलवाड उपस्थित होते.
बडोले म्हणाले शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेने महाराष्ट्रत सर्वात मोठी कर्जमाफी केली.12315 शेतकर्यांपैकी 9243 ला लाभ मिळाला काही तांत्रिक अडचणी मुळे 2972 बाकी आहेत. येणाऱ्या काळात तेही वंचित राहणार नसल्याचे सांगितले. 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजनेने वयोवृध्द शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आदिवासी विकास महामंडलाचे धान चुकार्याचा समभ्रम दोन दिवसात निकालात काढू.धुरमुक्त महाराष्ट्र योजनेमुळे महिलांना सन्मान मिळाला. वनहक्क कायदा हा केंद्राच्या अखत्यारीत येतो.न्यायालयात वनहक्क कायद्याच्या विरुद्ध याचिका दाखल आहे.याचिकेचा निकाल लागेपर्यंत वनहक्कपट्टे लांबणीवर जात असल्याची कबुली बडोलेंनी दिली.
दरम्यान कृषी विभागाच्या योजनावरून सभेत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात कृषि अधिकारी व बँकेच्या व्यवस्थापकांची भांभेरी उडाली.
यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी अनुपकुमार भावेंनी केली.
दोन तासातच आटपला जनसंवाद
जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करणासाठी ही सभा होती.अचानक उपस्थितांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. अधिकारी वर्ग गोंधळला अश्या वेळी स्वतः आमदारांनी माईक हातात घेतला. अनेकांना अरे बावा चूप बस या शब्दात आटोपते घावे लागले. रामदास कोहाडकर यांनी प्रश्न केल्या बरोबर त्यांना व्यासपिठावर बसण्याचे आमंत्रण देऊन गप्प केले गेले. वनहक्क पट्ट्याबाबत पाटणकर यांनी प्रश्न उपस्थित करताच त्यावर कुणीही उत्तर न देताच आयोजित संवाद सभा दोन तासांतच आटोपण्यात आली.
साहेब सत्कार झाला पण लाभ नाही
निमगाव येथील पुरुषोत्तम रामदास बन्सोड यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला म्हणून पंचायत समिती तर्फे सत्कार करण्यात आला.मात्र सत्कार होऊनही त्यांना अजून पर्यत सदर योजनेचा लाभ मिळाला नसल्याची माहिती बन्सोड ने सभेत दिली.
पंतप्रधान किसान पेन्शन योजना फेक ..!
सदर योजने बद्दल कृषी अधिकारी नि माहिती दिली, मात्र 18 ते 40 या अटीवरून चांगलाच गदारोळ झाला.कोण पालक 18 वर्ष्याच्या मुलाचे नावाने सातबारा करतो? या प्रश्नानी सभागृह दणाणले. शेवटी ही योजनाच फेक असल्याने दुसरे विषय घेण्याची मागणी उपस्थितांणी व पत्रकारांनीही केली.
जनसंवाद सभा केवळ शोबाजी
या सभेवरून काहीही निष्पन्न झाले नाही, कुणाच्याही तक्रारींचे निराकरण सोडा त्यावर चर्चा सुद्धा झाली नाही.दोन तासांत सभा आटोपली गेल्याने उपस्थित जनतेच्या हाती काहीच आले नाही ही नुसती शोबाजी असल्याच्या चर्चा सभास्थळी रंगल्या होत्या