गुंजी ते धामणगाव: राहुल गांधींची पदयात्रा सुरु

0
24

अमरावती- काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून (गुरुवारी) दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातील गुंजी ते धामणगाव अशी 15 किलोमीटरची ही पदयात्रा असेल. राहुल यांनी पहिल्यांदाच एवढे पायी चालणार आहेत. पदयात्रेत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. पदयात्रेत कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.
राहुल गांधी यांच्या गुंजी येथून पदयात्रेला सुरवात झाली आहे. राहुल गांधींचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत. राहुल गांधींचे शहापूरमध्ये कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत केले.केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याविरुद्ध राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत.या पदयात्रेत राहुल गांधींसोबत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,मोहन प्रकाश, बाला बच्चन, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
राहुल गांधी यांचा एकूण दौरा 175 किमीचा असेल, त्यातील 15 किमी ते पदयात्रा करणार आहेत आणि उर्वरित दौरा कारने करणार असल्याची माहिती आहे.
भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशमध्ये मोदींवर टीकास्त्र डागलं होतं. आता विदर्भाच्या दौऱ्यावर राहुल गांधी काय भूमिका घेतायत हे पाहाणं औत्सुक्याचं असेल. 59 दिवसांच्या विपश्यनेनंतर राहुल गांधी यांचा हा

सकाळी 8 वा. 50 मि. राहुल गांधी शहापूरच्या दिशेने रवाना
– राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात
– सकाळी 8 वा. 5 मि. राहुल गांधींचं गुंजीमध्ये आगमन, गुंजीमध्ये गावकऱ्यांकडून राहुल गांधींचं स्वागत
– थोड्याच वेळात राहुल गांधींच्या पदयात्रेला सुरुवात, गुंजीपासून राहुल गांधी 15 किमीची पदयात्रा करणार, काँग्रेसचे काही अन्य नेतेही उपस्थित
– सकाळी 6 वा. 53 मि. कारंजा टोलनाक्यावर राहुल गांधींच्या ताफ्यानं टोल न भरता हा दुसरा टोल नाका पार केला.
– सकाळी 6 वा. 40 मि. काठीयावाड ढाबाजवळ गावकऱ्यांकडून हारतुऱ्यांनी स्वागत.
सकाळी 6 वा. 30 मि. कोंढाळीच्या गावकऱ्यांकडून राहुल गांधींचं स्वागत. गावातील महिलांकडून औक्षण
– सकाळी 6 वा. 15 मि. नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी टोल नाक्यावरुन राहुल गांधींच्या ताफ्यात असलेल्या 30 ते 40 गाड्या टोल न भरता पुढे निघाल्या
– सकाळी 5 वा. 55 मि. राहुल गांधी नागपूरमधील रवी भवन गेस्ट हाऊसमधून नेते आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यासोबत अमरावतीसाठी रवाना