काँग्रेसपेक्षाही पुढे निघाली गोंदियाची भाजप

0
22

गोंदिया-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी जेव्हा राज्यात आघाडीचे म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते,तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच आरोप करायचे की येथील स्थानिक काँग्रेसचे आमदार हे आपल्या घरी अधिकारी,कमर्चारी यांना बोलावून त्यांच्याकडून विविध काम करवून घेतात.हे सत्य भाजपचे नेते व कार्यकर्ते नाकारु शकत नाही.परंतु आज परिस्थिती उलट झाली आहे.केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आली आहे.पालिकेवर भाजप,जिल्हा परिषदेचे अध्य़क्ष सोडले तर सर्व पदाधिकारी भाजपचेच म्हणजे सरकार भाजपच्याच हातात.जेव्हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याच भाजपची सरकार असेल तर भाजपच्या नेत्यांनाही वाटले असेल आपणही आपल्या पक्षाच्या कार्यालयात अधिकार्यांना बोलावले तर काय वाईट.यात काहीट वाईट नाही,काँगे्सचे आमदारही आधी सत्ता असताना घरी बोलावतच होते ना,परंतु आपण जेव्हा विरोधात असताना जे आरोप करायचो तेच आरोप आपल्यावरील होतील याचा कुणीच विचार न करता बिचारे आमचे पालकमंत्री ज्यांना याची काहीही माहिती नाही असे त्या कार्यक्रमाने बदनाम होतील असे कुणासही वाटले नसावे.चर्चेनुसार आज गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पालकमंत्री यांचे शासन अधिकृत पीएस यांच्या उपस्थितीत काही जिल्हा परिषेदतील व जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वाच्या 10-15 विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली.त्या बैठकीत प्रत्येक विभागप्रमुखाला अंदाजे 25 हजार रुपयाचे उदिष्ठ देण्यात आल्याची च्रर्चा असून काहीं उपस्थितांनी तर नाराजी व्यक्त केली.त्यांनी ते उद्या महाराष्ट्र दिनी कुठल्याही परिस्थितीत किंवा बैठकीच्या वेळी असतील तर गोळा करावयाचे होते.कारण काय तर म्हणे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे लंडन यात्रेनंतर पहिल्यांदाच गोंदिया शहरात आगमन होत असल्याने त्यांच्या जाहिरातीसह सत्कार सोहळ्यासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे.वास्तिवक या सर्व गोष्टीपासून जिल्ह्याचे आमचे भोलभाबडे पालकमंत्री अद्यापही अज्ञान म्हणजे त्यांना या प्रकाराची माहितीच नसल्याचीही कुजबुुज होती.आता भाजपच्या जिल्ह्या कार्यालयात त्या अधिकार्याना काय धडे देण्यात आले हे त्यांनाच ठाऊक असले तरी शहरात उठलेल्या चर्चांना भाजप किती उत्तर देणार हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक प्रशासनाला हा हरताळ फासण्याचा तर प्रयत्न नाही ना अशा च्रर्चांना गोंदिया शहरात उधाण आले आहे.