मोटारसायकलस्वार अज्ञात युवकांनी विद्यार्थीनीवर केला असिड हल्ला

0
29
गोंदिया दि.१८ :  नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेणार्‍या एका  विद्यार्थिंनीवर दोन अज्ञात युवकांनी मोटारसायकलने येत अॅसीड( ज्वलनशील पदार्थ) टाकून जीव घेणा हल्ला केल्याची घटना आज (दि..१८) तालुक्यातील मुंडीपार ते ढाकणी मार्गावर दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील खडबंदा येथील युवती नागपूर जाण्यासाठी बसने निघण्यापुर्वी मुंडीपार येथे ग्राहक सेवा  केंद्रात काम असल्याने ती उतरली. दरम्यान ग्राहकसेवा केंद्राकडे जातांना त्या युवतीवर २ अज्ञात युवकांनी बुरखा घालून मोटरसायकलने येऊन  ज्वलनशील पदार्थ टाकून मोटारसायकलने पोबारा केला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी नागपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून युवतींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.कुणाला काही कळण्याआधीच त्या युवकांनी तिरोडा मार्गाने भरधाव वेगाने मोटारसायकल पळविल्याचे वृत्त आहे.गुन्हा दाखल होईपर्यंत हे अज्ञात आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले असून गोंदिया जिल्ह्यात आता गुन्हेगारीत वाढ होऊ लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
गोंदिया तालुक्यातील खळबंधा गावात राहणाऱी ही युवती महाविद्यालयाला सुट्या असल्याने काही दिवसाआधी ती स्वगावी आली होती. आज ती पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली होती.गोंदियावरुन ती विदर्भएक्सप्रेसने रवाना होणार होती.परंतु त्या आधीच आरोपीं दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर अॅसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर अॅसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागताच परिसरातील नागरिकांना धाव घेत तिला लगेच रुग्णालयात हलविले.तर दुसरीकडे गावकऱ्यांनी गंगाझरी पोलिसांना माहिती दिली.हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.आता गोंदियासारख्या ग्रामीण भागापर्यंत अ‍ॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अ‍ॅसिड कुठून आले? असा सवाल देखील गावकरी करत आहेत.तर ते आरोपी युवतीवर किती दिवसापासून पाळत ठेवून होते.त्यांना कोण सहकार्य करीत होते आधी अनेक प्रश्न या संबधातून निर्माण झालेले आहेत.