वेतनासाठी विलंब करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई

0
14

भंडारा दि.२८: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कक्षात शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले. वेतनासाठी विलंब लावणाऱ्या मुख्याध्यापकांवर येत्या महिन्यापासून कडक कार्यवाही करण्याचे प्रसंगी वेतन वाढ कायम स्वरूपी स्थगीत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन जाने. २०१५ पासून झालेले नसल्याने शिक्षकांमध्ये संघटनामध्ये रोश निर्माण झालेला होता अशी अनेक प्रकरणे शिक्षण विभाग प्राथमिक यांनी जाणीव पुर्वक वेगवेगळ्या सबबी सांगून अडकवून प्रलंबित ठेवलेली होती.

यासर्व प्रकरणांना मागीविण्यासाठी सोमवारी सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात प्रत्येक महिन्याच्या ५ तारखे पर्यंत जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी डी.डी.ओ-२ यांच्याकडे आॅन लाईन वेतन सादर केलेच पाहिजे, अन्यथा अशा मुख्याध्यापकांच्या वेतनासाठी तात्काळ थांबविण्यात येतील. जिल्हा परिषदे अंतर्गत शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या सरळ सेवा भरती, आचर सहिता संपताच मार्गी लावली जातील.

अनेक वर्षापासून सेवा जेष्ठता विविध कारनाने प्रकाशित झाली नाही ती येत्या १५ जुलै ला प्रकाशित होईल ३० जुलैपर्यंत त्यावर हरकती घेता येईल.

वेतना मधील तफावत दूर करून लाभ देणे, डीसीपीएस अंतर्गत कपात केलेल्या राशीचे हाऊचर शिक्षकांना देणे, सेवा निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापकांना रजा रोखी करणाचा फायदा देण्यासाठी राज्य शासनानाकडून निर्देश मिळविणे, जिल्हा परिषद शिक्षक सेवकांची जाणीवपुर्वक सोवा सातत्यांची अडवणूक ठेवलेली २४ प्रकरणे निकाली काढणे, केंद्र प्रमुखांच्या बदल्या रद्द होणार नाहीत, अतिरिक्त प्रभार सांबाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० टक्के मानधन देणे इयत्ता सहा ते आठच्या शिक्षकांची पदे आचार संहिता संपताच भरूण काढणे अशी अनेक प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश सीईओ निंबाळकर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले.