गोंदिया- –जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना उत्कृष्टपणे राबवणार्या डॉक्टरांना जिल्हाधिकारी कक्षात नयना गुंडे यांच्या हस्ते डॉक्टर डे निमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. स्वाती विद्यासागर व डॉ. गौरव अग्रवाल यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य आश्वासन संस्था, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांना २८ जुन रोजीच्या दिलेल्या पत्रानुसार जिल्ह्यात १ जुलै रोजी डॉक्टर डे दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे डॉक्टर डे साजरा करण्यात आला.
त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना उत्कृष्टपणे राबवणार्या डॉ. स्वाती विद्यासागर व डॉ. गौरव अग्रवाल यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. जयंती पटले उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्याच्या सोयी व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व त्यांच्या रुग्णालयीन खर्चाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून कोरोना काळात मंदिर बंद असताना सर्व रुग्णालय उघडी राहून रुग्णांची सेवा केलेल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी उल्लेखनीय केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.