16 वर्षांनी लहान डॉ. गुरप्रीतसोबत घेतले फेरे; पदावर असताना लग्न करणारे पहिले मुख्यमंत्री

0
64

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज गुरुवारी पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. पंजाबच्या इतिहासात पदावर असताना लग्न करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. चंदीगडमधील मुख्यमंत्री निवासस्थानी 48 वर्षीय मान यांनीहरियाणातील पिहोवाच्या 32 वर्षीय डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न केले. सकाळी 11 वाजल्यापासून विधी सुरु झाले होते. मान आणि गुरप्रीत यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीयही लग्नाला उपस्थित राहिले. केजरावाल यांनी वडिलांचे तर खासदार राघव चढ्ढा यांनी भावाचे विधी पार पाडले.

खासदार राघव चढ्ढा हेही भगवंत मान यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पंजाबमध्ये पोहोचले.
खासदार राघव चढ्ढा हेही भगवंत मान यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पंजाबमध्ये पोहोचले.

2019 पासून मान कुटुंबाशी ओळख
डॉ. गुरप्रीत कौर या मूळच्या हरियाणातील पेवोहा येथील टिळक कॉलनी येथील आहेत. त्यांनी अंबाला येथील मुलाना मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस शिक्षण पुर्ण केले. सध्या त्या राजपुरा येथे राहतात. भगवंत यांच्या बहिणीची गुरप्रीत यांच्याशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण मान कुटुंब चांगले ओळखत होते. भगवंत मान आणि गुरप्रीत यांची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. तेव्हा मान संगरूरचे खासदार होते. मान यांच्या सीएम पदाच्या शपथविधी समारंभातही गुरप्रीत दिसल्या होत्या.

गुरप्रीत सर्वात लहान
गुरप्रीत ३ बहिणींत सर्वात धाकट्या, एक अमेरिकेत, एक अॉस्ट्रेलियात : डॉ. गुरप्रीत तीन बहिणींत सर्वात धाकट्या आहेत. मोठी बहीण नीरू यांचा विवाह अमेरिकेत झाला असून त्या नासात वैज्ञानिक आहेत. दुसरी बहीण गोपी यांचे लग्न सुनाममध्ये (पंजाब) झाले होते. त्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या आहेत. गुरप्रीत यांचे वडील शेती करतात. त्यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे. आई राजेंद्र कौर गृहिणी आहेत.

मुलगा दिलशान आणि मुलगी सीरतसोबत भगवंत मान
मुलगा दिलशान आणि मुलगी सीरतसोबत भगवंत मान

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट
सीएम मान यांचे पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरसोबतचे संबंध राजकारणामुळे बिघडले होते. 2014 मध्ये त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर हिनेही प्रचार केला. मात्र, पुढच्याच वर्षी संबंध बिघडू लागले. सीएम मान म्हणाले की, मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यांनी कुटुंब आणि पंजाबमधून पंजाबची निवड केली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पत्नी मुला-मुलीला घेऊन इंद्रप्रीत अमेरिकेत स्थायीक झाल्या. मान यांच्या आईने सांगितले,‘खासदार असताना मुलाने लग्न करावे, अशी माझी इच्छा होती,मैंनूं की पता सी कि जद मेरे मान दा ब्याह होवेगा तद ओह मुखमंत्री होवेगा।

पहिल्या पत्नी इंद्रप्रीत आणि त्यांची दोन मुले ( जुना फोटो)
पहिल्या पत्नी इंद्रप्रीत आणि त्यांची दोन मुले ( जुना फोटो)