गोंदिया :- भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरीकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात प्रथम क्रमांकाचा देश असून भारतात अनेक तरुण पिढी बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे. दारिद्र्य ,बेरोजगारी , अंधश्रद्धा ,धर्मवाद ,भाषावाद ,जातीयवाद , प्रांतवाद सरकारी विभागाचे खाजगीकरण , शेतकर्याच्या शेतमालाला योग्य भाव न मिळणे यासारख्या समस्या निर्माण झाली आहे . सध्या बदलत्या भारताच्या आणि महाराष्ट्राचे एकूण परिस्थिती बघितलं असता वेगळ्या पध्दतीने राजकारण सुरू आहे . असे जाणवते. मोठ्या संख्यने असणाऱ्या OBC समाजावर त्यांच्या परिणाम होत आहे .त्यामुळे विदर्भ तेली समाज महासंघातर्फे संपूर्ण विदर्भ भर समाजातिल विविध प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवांद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांतील समाज बांधवानी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहवे.असे आव्हान विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष रघुनाथराव शेन्डे आणि सरचिटणीस डॉ.प्रा नामदेव हटवार यांनी केले आहे.
सवांद यात्रा वेळापत्रक
६ जून 2023 वेळ सकाळी १०.०० वा. स्थळ संताजी सभागृह पाण्याचे टाकीजवळ भंडारा ,त्यानंतर ६ जून 2023 गोंदिया वेळ सायंकाळी ४.०० वाजता स्थळ संताजी सभागृह पिडकेपार रोड गोंदिया ,
७ जून २०२३ गडचिरोली वेळ सकाळी १०.०० वाजता स्थळ सुरेश भांडेकर यांचे कार्यालय कॅम्प एरिया ,७ जून २०२३ बुधवार चंद्रपूर वेळ सायं .४. वाजता स्थळ मातोश्री सभागृह तुकूम चंद्रपूर ,
८ जून २०२३ गुरुवार वर्धा वेळ सकाळी १०.वाजता स्थळ समाज भवन वर्धा , 8 जून 2023 यवतमाळ वेळ सायं ४ . वा . स्थळ समाज भवन यवतमाळ ,
९ जून २०२३ शुक्रवार वासिम सकाळी १० वाजता स्थळ समाज भवन वाशिम, ९ जून 2023 शुक्रवारला बुलढाणा वेळ सायं ४.वाजता स्थळ संताजी कान्व्हेंट मेहकर बुलढाणा ,
१० जून 2023 शनिवार अकोला वेळ सकाळी १०. वाजता स्थळ तेली समाज कार्यालय पत्रकार कॉलनी १० जून 2023 अमरावती वेळ सायंकाळी चार वाजता स्थळ समाज भवन अमरावती
संवाद यात्रेत नेतृत्व विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष .रघुनाथ शेन्डे , सरचिटणीस डॉ.प्रा नामदेव हटवार ,संघटक प्रा.रमेश पिसे,विलास काळे,उमेश कोरराम, युवा आघाडी अध्यक्ष शेषराव गिरपुंजे ,कृष्णा बेले , सहसचिव संजय सोनटक्के या संवाद यात्रेतच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आव्हान प्रकाश भुरे ,रविंद्र मनापुरे ,आनंदराव कृपाने , नारायण बावनकर ,राजेश चांदेवार , अँड पुष्पकुमार गंगबोईर यांनी केलेलं आहे .