गोंदिया,२४ः येथील जेष्ठ नागरीक संघाच्या कार्यालयात आज २४ मे रोजी महाराष्ट्र राज्य प्रविण प्रशिक्षक संघटना शाखा गोंदियाची समन्वय सभा पार पडली.या सभेत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष नारायणप्रसाद जमईवार,कार्याध्यक्ष संजय कटरे,सरचिटणिस चंद्रकांत गौतम,उपाध्यक्ष-सौ.राखी ठाकरे,सहसचिव आशा कुंभरे, कोषाध्यक्ष विजय भुरे,सल्लागार महेंद्र मेश्राम,श्रीमती नाहीद कुरैशी,प्रसिद्धी प्रमुख अजय अंबादे, कार्यकारीणी सदस्यात सौ.मेघा राखडे,सौ.कामीणी गणविर,सौ.चेतना टेंभुर्णे,सौ.संध्या ढवळे,सौ.ममता राऊत,सौ.भुमिता येळे,सौ.प्रज्ञा बंसोड, श्री.हेमकृष्ण संग्रामे यांची निवड करण्यात आली.
सभेत 2023-24 वर्षातील प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची गुणवत्ता,आलेल्या अडचणी,मानधन मिळण्यासाठी होणारा उशीर,गुणवत्ता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना बाबतीत चर्चा करण्यात आली.तसेच वार्षिक सदस्यता फी 500/-रू ठरविण्यात आली.वैयक्तिक माहिती पत्रक भरून घेण्यात आले,तसेत ज्यानी भरले नाही त्यांनी त्वरित भरून देण्याचे आवाहन करण्यात आले.पुढे प्रविण प्रशिक्षकाच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी व प्रशिक्षण कार्यक्रम गुणवत्ता पुर्वक होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.