आमगाव-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-भाजपची बंडखोरी कायम

0
1112

आमदार कोरेटेचा अर्ज बाद,भाजपकडून मडावी ,दहिवलेंची बंडखोरी

गोंदियात भाजप-काँग्रेस मध्येच खरी लढाई,मनसेचीही अस्तित्तावाची लढाई

गोंदिया विधानसभा मतदारसंघात आज १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून १५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.या मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पकंज यादव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे काँग्रेसचे संचालक राजीव ठकरेले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे या मतदारसंघात खरी लढाई ही भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार विनोद संतोष अग्रवाल व काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास शंकरलाल अग्रवाल यांच्यात होणार आहे.या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ओबीसी चेहरा रिंगणात उतरविण्यात आला असून सुरेश रमण चौधरी हे रिंगणात आहेत.तर बहुजन समाज पार्टीच्यावतीने नरेंद्र मेश्राम हे रिंंगणात आहेत.

आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-भाजपमध्ये बंडखोरी
आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सहसराम कोरेटे यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसचा एबीफार्म न जोडल्याने रद्द झाला आहे.त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आदिवासी नेते शंकर मडावी यांनी सुध्दा आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने  बंडखोरी झाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसणार आहे.भाजप महायुतीच्यावतीने माजी आमदार संजय पुराम तर काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम हे रिंगणात आहेत.या मतदारसंघातून ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप-राँष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातच होणार सरळ लढत
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांनी सादर केलेले उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशावर मागे घेतल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रविकांत खुशाल बोपचे हे रिंगणात आहेत.तर भाजप महायुतीच्यावतीने विद्यमान आमदार विजय भैय्यालाल रहागंडाले हे तिसर्यांदा मैदानात आहेत.वंचित आघाडीच्यावतीने अतुल गजभिये रिंगणात आहेत.या मतदारसंघातून ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून २१ उमेदवार रिंगणात आहेत.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात बंडखोरी
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात बंडखोरी झाली असून काँग्रेसच्या इतर उमेदवारासह विद्यमान आमदार मनोहर चंंद्रिकापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.या विधानसभा मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे चौरंगी लढतीचे चित्र सध्याच्या घडीला निर्माण झाली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड,महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे इंजि.राजकुमार बडोले हे उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि.रत्नदिप दहिवले यांनी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवली आहे.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांचे पुत्र डाॅ.सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.