गोंडी पेंटींगच्या माध्यमातून आर्थिक उदरभरण

0
54

महिला दिन विशेष लेख

गोंदिया-आदिवासी गोंडी पेंटींगच्या माध्यमातून आर्थिक उदरभरण विदर्भाच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यातील कवलेवाडा येथे राहणाऱ्या योगिता मौजे यांनी आदिवासी संस्कृतीची जनसामांन्यामध्ये ओळख व्हावी म्हणून मागील 19 वर्षांपासून आदिवासी गोंडी पेंटींग तयार करून विक्री करीत आहे.
कवलेवाडा येथे राहणाऱ्या योगिता मौजे यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले असून त्यांनी ॲग्रीकल्चरचा डिप्लोमा केला आहे. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असतांना कुटुंबाला हातभार लागावा याकरीता त्यांनी आदिवासी गोंडी पेंटींग तयार करण्यास सुरूवात केली. सन 2006 मध्ये योगिता यांनी सुरू केलेल्या आदिवासी गोंडी पेंटींगच्या माध्यमातून त्या वर्षाकाठी त्यांना 7 ते 8 लाख रूपयांचे आर्थिक पाठबळ मिळत आहे.
आजपावेतो त्यांनी जवळपास 75 आदिवासी समुह तयार करून इतर भागातून आलेल्या महिलांना आदिवासी गोंडी पेंटींगचे प्रशिक्षण देवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम त्या करीत आहेत.महिला सक्षमीकरण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून योगिता मौजे यांनी कवलेवाडा या आपल्या गावामध्ये शिल्पी सखी स्वयंसहायता समुह तयार केला. गोंदिया हा आदिवासी
जिल्हा असून दुर्गम भागातील महिलांचे जिवनमान उंचविण्यासाठी योगिता मौजे यांनी गावातील महिला व आदिवासी महिलांना हाताशी धरून आदिवासी कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. लुप्त होत चाललेल्या आदिवासी कला जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी शाश्वत उपजिवीका व रोजगार निर्मीती करणे हा त्यांचा या मागचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या समुहाच्या माध्यमातून गावातील 45 आदिवासी महिलांचा शिल्पी सखी आदिवासी उत्पादक गट तयार करून त्यांना मोफत प्रशिक्षण दिले.

योगिता मौजे अनेक पुरस्काराच्या मानकरी

 सन 2023 मध्ये कवलेवाडा ग्रामपंचायत तर्फे अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त.
 सन 2019 मध्ये उत्कर्ष फाऊंडेशन नाबार्ड कडून स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत.
 सन 2023 मध्ये आदिवासी विकास विभाग, देवरी यांच्याकडून G-20 संमिट कडून
सन्मानीत.

श्वेता पोटुडे –राऊत,प्र. जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया