*उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
अर्जुनी-मोर. –महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. महाराष्ट्राला महान संत आणि थोर नेत्यांचा गौरवशाली इतिहास लाभलेला असतांना इतिहासाचे विकृतीकरण करत सामाजिक वातावरण दूषित करण्याचे काम मंत्री नितेश राणे करीत आहेत. मंत्री नितेश राणे प्रक्षोभक विधाने करून दररोज भडकाऊ आणि फूट पाडणारे विधाने करून गुण्या गोविंदाणे राहणाऱ्या दोन धर्मात आग लावण्याचे काम करीत असल्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेवून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी तालुका युवक कोंग्रेसच्या वतीने आज ता. २१ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदणातून करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरापगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांनी कधीही जाती धर्माविरुद्ध द्वेष वाढवला नाही परंतु भाजप आणि त्यांचे मंत्री महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी महाराजांच्याच नावाचा गैरवापर करीत आहेत. याउलट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महायुती सरकार संरक्षण देत आहे. त्यामुळे जातीय दंगल घडवण्यास कारणीभूत असलेल्या मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी तालुका युवक काँग्रेस कमिटी अर्जुनी मोरगावच्या वतीने आज करण्यात आली. याबाबतचे निवेदन देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे.
यावेळी शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष हितेश हत्तीमारे,नगरसेवक सर्वेश भुतडा अतुल बनसोड,आशिष कापगते लेखराम राव, अंकित शुक्ला, सौरभ हुकरे, वैभव दहीवले, नीर पालीवाल,तेजस कांबळे, नितीन कुंदणकर,नशीब रामटेके राहुल मेश्राम, एकनाथ मुनेश्वर, झेलिराम रहिले, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.