उत्कर्ष महेश वलथरे राज्यस्तरावर सन्मानित; आय एम विनर परीक्षेत नागपूर विभागात प्रथम

0
54

गोंदिया, (दि. 25): आय.एम.विनर या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये नागपूर विभागात इयत्ता तिसरी मधून प्रथम आल्याने शारदा कॉन्व्हेन्ट गोंदिया चा विद्यार्थी उत्कर्ष महेश वलथरे याचा राज्यस्तरावर सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच (दि.२३) हडपसर, पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्यगृह या ठिकाणी थाटात पार पडला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर विधानसभा क्षेत्राचे आमदार चेतन तुपे, सहायक कामगार आयुक्त अनिकेत थोरात होते. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यातील शारदा कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी उत्कर्ष महेश वलथरे नागपूर विभागात प्रथम आल्याने त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. त्याचे पालक महेश वलथरे हे पोलीस विभागात कार्यरत आहेत. राज्यस्तरावर सन्मानित झाल्याबद्दल त्याचे शारदा कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूलच्या संचालिका श्रीमती योगिता भुवन बिसेन, प्राचार्य संतोषसिंह नैकाने, पर्यवेक्षिका तारा खोटेले, पर्यवेक्षक विनोद खोब्रागडे, शिक्षिका मीनल टेंभरे, यांनी अभिनंदन केले आहे.