शेतकरी जीव देतो, कापूस, धान, सोयाबिनच्या दरवाढीवर बोला
समाज प्रबोधनातून सत्यपाल महाराज यांचे मार्गदर्शन
गोंदिया : राज्यात सद्या चारसे वर्षा पुर्वीच्या इतिसाहावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र चारसे वर्षा पुर्वीचे खड्डे खोदून काय मिळणार आहे, त्या ऐवजी शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे, शेतात शेतकरी रात्र-दिवस राबत आहे, कापूस, धान, सोयाबिनच्या दरवाढीवर चर्चा करा तसेच महापुरुषांची विचारधारेला आत्मसात करा आणि वाईट व्यसन सोडा असे प्रतिपादन सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बिरसी (विमानतळ) येथे समता संग्राम परिषदच्या माध्यमातुन चवदार तळे महाड़ सत्याग्रह क्रांती दिनानिमित्त २० मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेच्या जवळ सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रा.पं.सदस्य नरेंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेत समता संग्राम परिषद सतीश बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिप प्रज्वलक म्हणून सरपंच उमेशसिं पन्डेले, सामाजिक कार्यकर्ते राजू बोरकर, मुख्य अतिथी राजु राहुलकर, मुख्य मार्गदर्शक विनोद मेश्राम, एस.बी. महाजन, वामन मेश्राम, ग्राप.सदस्य संगीता तावाडे, सुग्रता परते, संतोष सोनवाने, विजेंद्र मेश्राम, राजेश रामटेके, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी धनीराम तावाडे, नरेंद्र गजभिए, शिक्षक कबिर बैस, पोलीस पाटील महेश शहारे,भोजराज कोरे, संजय एस.मेश्राम, रविन्द्र कोल्हाटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद मेश्राम, प्रास्ताविक राजू राहूलकर तर आभआर वि. यु. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश भरणे संतोष भालाधरे, प्रकाश वासणीक, शुभम मेश्राम, अंकुश रामटेके, अमन वंजारी, निखील बोरकर आदींनी सहकार्यकेले.