■देवरी तालुका शिवसेना(शिंदे गट) च्या वतीने निवेदनातून तक्रार दाखलकरूण मागणी.
देवरी,दि.२७: शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लील काव्य कुणाल कामरा स्टॅड काव्य कॉमेडी कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमामुळे कुणाल कामरा यांनी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले. यामुळे आम्ही शिवसैनिकांची भावना दुखावली गेली. करीता कुणाल कामरा यांच्या विरूध्द कडक कारवाई करावी असे निवेदनातून तक्रार देवरी तालुका शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने देवरीचे ठाणेदार प्रवीण डांगे यांना बुधवार (दि.२६) रोजी सादर केली आहे.
ह्या निवेदना मार्फत तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या आदेशा नुसार देवरी तालुका शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दाखल केली.
निवेदनाच्या रूपात तक्रार दाखल करणा-या शिष्टमंडळात विधानसभेचे संघटक प्रमुख बळीराम कोटवार,शिवसेना देवरी तालुका प्रमुख जयपाल प्रधान, महिला तालुका प्रमुख. आरतीताई जांगडे, देवरी शहर प्रमुख महेश फुन्ने,महिला शहर प्रमुख सलमा पठाण, तालुका युवती सेनाप्रमुख निलेशताई रामटेके, शिवसैनिक छगनलाल मुंगणकर,ब्रह्मा अर्करा व नरेश राऊत यांचा समावेश आहे.