देवरी तालुक्यातील १४५ परीक्षा केंद्रावर ९३६ परीक्षार्थींचा सहभाग
देवरी,दि.३० – केंद्र शासनाच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील १४५ परीक्षा केंद्रांवर असाक्षर आजी-आजोबा यांची साक्षरता परीक्षा गेल्या २३ मार्च २०२५ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत ९३६ आजी आजोबांनी सहभाग घेतला.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील निरक्षर व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सन २०२७ पर्यंत १००% नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमाचे आहे. सदर कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येते . उल्लास पोर्टल वर नोंदीकृत असाक्षर यांची परीक्षा घेण्यात येते.
मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेकरिता देवरी तालुक्यातील एकूण ९५३ असाक्षर यांची उल्लास पोर्टल वर नोंदणी करण्यात आली होती पैकी ९३६ असाक्षर परीक्षेला बसलेत. असाक्षर आजी आजोबांना या वयात परीक्षा देतांना एक वेगळाच आंनद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
परीक्षेचे स्वरूप आणि उतीर्ण होण्याचे निकष
परीक्षा एकूण १५० गुणांची होती. वाचन लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयाच्या प्रत्येकी ५० गुणांच्या परीक्षेत प्रत्येक विषयात किमान १७ गुण मिळणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्र हे असाक्षर व्यक्तीचे नोंदणी करण्यात आलेल्या शाळाच ठेवण्यात आले होते. राज्य साक्षरता केंद पुणे यांच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली व सुरळीत पार पडली. तालुकास्तरावर सदर परीक्षेचे नियोजन व कार्यवाही श्री एम एस मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी यांच्या मार्गदर्शनात व श्री डी टी कावळे गट समन्वयक यांच्या सहकार्याने श्री उमेश भरणे तालुका कार्यक्रम समन्वयक व समग्र शिक्षा कर्मचारी यांनी पार पाडले.परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याकरिता केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले