अर्जुनी-मोर.-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे द्वारा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया द्वारा २९ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. सदरील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंपळगाव/खांबी येथील सहायक शिक्षक हंसराज पांडुरंग खोब्रागडे यांना इयत्ता १ ली २ री गटातील विषय इंग्रजीमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र नरेश वैद्य प्राचार्य डायट गोंदिया, डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी माध्यमिक, सुधीर महामुनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, अधिव्याख्याता घुले मॅम, राठोड, ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्काराबद्दल पिंपळगावचे सरपंच विलास फुंडे, शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सदानंद मेंढे तथा सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.